Similar Products
From the Publisher
Product Information
जग बदलवून टाकणार्या अनोख्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी जीवनचरित्रं......... इलॉन मस्क - लेखक - आशा कवठेकर जिद्द, प्रचंड मेहनत, दूरदृष्टी आणि नवनिर्मितीच्या जोरावर जग बदलवणार्या गोष्टींची निर्मिती करणार्या अवलियाचा प्रेरणादायी जीवनप्रवास रतनांकित पर्व - लेखक - संध्या रानडे व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि व्यवसायवृद्धीचा ध्यास या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणार्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा व्यक्तिमत्त्वाची कहाणी. इंद्रा नूयी - लेखक - अन्नपूर्णा स्पष्टवक्तेपणा, आत्मविश्वास, अमर्याद ऊर्जा, प्रेरणादायी दृष्टिकोन या जोरावर जगप्रसिद्ध पेप्सिकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी बिल गेट्स - लेखक - आशा कवठेकर केवळ पैसा कमवणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता समाजोपयोगी कार्य करून मानवतावाद जोपासणार्या, मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीच्या निर्मात्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी नारायण मूर्ती - लेखक - रितू सिंग एका अशा आदर्श नेतृत्वाचा प्रवास ज्याने उद्योगाचा विकास आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नवीन उच्चांक स्थापित केले. चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी - लेखक - नीलिमा करमरकर प्रत्येकाला आयुष्यात चॉकलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन, लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणार्या चॉकलेटियरचा अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या हर्षीज चॉकलेटचा निर्माता मिल्टन हर्षी या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट.
Product Details
- Publisher: MyMirror Publishing House Pvt. Ltd.
- Language: Marathi
- Pages: 893
- ISBN: 6 Books
- Weight: 900 gm
- Dimensions: 21 cm * 14 cm* 14 cm
- Country: India
- Category: Biography