Similar Products
From the Publisher
Product Information
नेतृत्व हे जन्मावं लागतं असं म्हटलं जातं; पण हा समज चुकीचा असून लीडर घडवावा लागतो, प्रत्येकजण लीडर बनू शकतो, असा विश्वास मनोज अंबिके यांनी दिला आहे. लीडरशिप हि कला आहे, ती विकसित करावी लागते. लीडर कसा असावा, त्याच्याकडे कोणते गुण असावेत, हे त्यांनी 'सामर्थ्यशाली लीडर' मधून सांगतिले आहे. नेतृत्व स्वतःत रुजवायला हवं. अनेकदा परीस्थितीही हे गुण रुजवते. लीडरने प्रेरणादायी असावं, ध्येय मोठं ठेवावं, ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्यात झोकून द्यावं. नोकरी किंवा व्यवसाय करताना आपण जास्त काय देऊ शकतो, याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे आपले ग्राहक संतुष्ट तर होतीलचं, शिवाय आपल्याबद्दलचा विश्वासही वाढेल. लीडरची कार्यक्षमता, समस्येवर उपाय शोधण्याची कला, यश टिकविण्याची पाच सूत्रं, शक्तिशाली नेतृत्वासाठी आवश्यक गुण, आत्मविश्वास, सहकाऱ्यांचं कौतुक करण्याची सवय, सकारात्मक - प्रसन्न वृत्ती, लीडरशिपचे शत्रू आणि मित्र याबाबत सांगून एखाद्यातील नेतृत्व कसं बाहेर काढावं, याचं मार्गदर्शन केलं आहे. * रहस्य प्रसन्न लीडरशीपचं * मीटिंग जिंकण्याची कला * समस्या नाही, ही तर संधी * खरा लीडर कसा ओळखाल? * माझं स्थान कसं निर्माण करू? * प्रेरणादायी लीडर कसे बनाल? * सचिन पळून गेला असता का? * नेतृत्वगुण कसे अंगी बाणायचे? * सामर्थ्यशाली नेतृत्वाचे चार पैलू * प्रभावशाली संवाद साधण्यासाठी... * कर्मभूमी नसते, ती तयार करावी लागते * सहकार्यांकडून कार्य पूर्ण करून घ्यायच्या पद्धती
Product Details
- Publisher: Mymirror Publishing House Pvt. Ltd
- Language: Marathi
- Pages: 192
- ISBN: 9788192702056
- Weight: 200 gm
- Dimensions: 21 x 14 x 2 cm
- Country: India
- Category: Mind Body Spirit